सोलापूर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सोलापूर दौऱ्यावर आहेत शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा ताफा थेट सोलापूर हैदराबाद रोड कडे निघाला त्याठिकाणी अखिल भारतीय समता परिषदेचे सोलापूर शहराचे माजी अध्यक्ष मुस्लिम समाजाचे नेते उस्मान बागवान यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. स्वतः भुजबळ साहेब आपल्याकडे आल्याचे पाहता उस्मान बागवान यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बागवान कुटुंबीयांनी मंत्री भुजबळ यांचे मनोभावे स्वागत केले यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार माजी महापौर महेश कोठे, विद्या लोलगे, रियाज मोमीन यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



















