सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षानंतर कान वाटप समितीची बैठक झाली, या बैठकीत 39 कामांचे वाटप मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता (सुभे) यांना करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, काम वाटप समिती अध्यक्ष तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत 16 कामे ही मजूर संस्थेसाठी ठेवण्यात आली होती तर 22 कामेही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी ठेवण्यात आली. 26 टक्के मजूर 40% सुभे आणि उर्वरित 33% ओपन टेंडर असे या काम वाटपाचे स्वरूप आहे. यामध्ये 39 मजूर संस्थांनी तर 35 सुभेनी सहभाग घेतला.
पारदर्शक पद्धतीने राबवलेल्या या प्रक्रियेमध्ये एका कामासाठी उपस्थित आहेत त्यांच्या प्रमाणे नंबरचे कॉइन हे लॉटरी प्रमाणे काढण्यात आले आणि कामाचे वाटप झाले. इस्टिमेट रेट प्रमाणे कामे वाटप झाली आणि सुमारे सव्वा लाख रुपये उत्पन्न या प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला मिळाल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कामवाटप समितीच्या बैठकीवर समाधान व्यक्त करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.