विधान परिषदेचे नुतन आमदार सत्यजित तांबे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव पंडित सातपुते, शहर मध्य अध्यक्ष वाहिद विजापुरे, दक्षिण विधानसभा सरचिटणीस सचिन वेर्णेकर, शहर मध्य विधानसभा माजी युवक अध्यक्ष योगेश मार्गम, युवा नेता नागेश म्याकल, युवक काँग्रेस सरचिटणीस श्रीनिवास परकीपडंला, युवा कार्यकर्ते अमर हळ्ळी, शाहु सलगर, मनोहर मार्चला, देवा करगुळे आदी उपस्थित होते.


















