सोलापूर : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पोलीस आयुक्तालय,सोलापूर शहर कडुन एका बेकायदेशीरपणे प्रतिष्ठित ठिकाणी चालणा-या कुंटणखान्यावर कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर शहर भागातील द्वारका नगर ओम गर्जना चौकाजवळ,जुळे सोलापूर येथे बेकायदेशीर पणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी वरुन ०४/०४/२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षा कडील अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचुन,प्लॉट नं.१४६/१४७,द्वारका नगर ओम गर्जना चौकाजवळ,जुळे सोलापूर या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठवून बातमीची खात्री करून १८.४५ वाजता छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील महिला आरोपी १) निर्मला शंकर राजपूत हिने ०१ पिडीत महिलेस आपल्या रहाते घरात अटकावून ठेवून तिची शारीरीक पिळवणुक करून तिस पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या कडून वेश्या व्यवसाय करवून घेवून तिच्या कमाईवर स्वत:ची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने, तिच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ भा.द.वि.सं.क.३७०(अ),(२), प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुन्हा दाखल करुन ०१ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे.आरोपीस न्यायालयात दि.०५/०४/२०२२ रोजी हजर केले असता न्यायालयाने आरोपीची ०४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडील पोलीस निरीक्षक श्रीमती विजयालक्ष्मी कुरी हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त हरिष बैजल व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी,पोहेकॉ/११४२ राजेंद्र बंडगर, मपोहेकॉ/७७७ सुवर्णा काळे,पोना/८४६ महादेव वंडगर,मपोना/६३९ अर्चना गवळी,मपोना/३०० ज्योती मोरे,मपोकॉ/१४३९ तृप्ती मंडलिक, पोकॉ/७२४ दादा गोरे यांनी उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करुन सदरचा छापा यशस्वी केला.
सोलापूर शहरातील सुज्ञ नागरिकांना अवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे बेकायदेशीपणे चालणाऱ्या कुंटणखान्याबाबत कोणास काही माहिती प्राप्त झाल्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी महिला पोलीस निरिक्षक श्रीमती कुर्सी याचा मोबाईल क्रमांक ८८८८८९४२३६ यावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी. आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.


















