सोलापूर : जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा पहिल्यांदाच वाढदिवस साजरा होत आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक पाहता वाढदिवसाचा कुठेही उत्साह दिसून आला नाही.
काँग्रेस भवनासमोर केवळ दाखवण्यासाठी जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छाचा डिजिटल बॅनर लावला आहे. सोलापुरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शुक्रवारी दौरा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल हे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष झालेत. सोलापुरातील शिवप्रेमींनी त्यांचा ताफा रोखू असा इशारा दिला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा या राज्यपाल यांच्या दौऱ्याकडे लागल्या होत्या या दौऱ्याने काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम झाकले गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या नूतन पदाधिकार्यांच्या निवडी झाल्या. कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यावरून बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दिसून आली. एका ठराविक गटाला मोठी पदे दिल्याने अनेकांनी काँग्रेस कमिटी कडे येणे बंद केले आहे. जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात पाहिले तर तेच-तेच चेहरे रोज दिसतात. यापूर्वी कधी काँग्रेस भवनाकडे फिरकत नसणाऱ्यांना रोज बैठकीचे ठिकाण मिळाले असल्याचे चित्र आहे.
पदे मिळाल्यापासून या पदाधिकाऱ्यांनी विशेष असा कोणताही कार्यक्रम घेतलेला नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिराती सुद्धा दैनिकांना अपेक्षेप्रमाणे दिसल्या नाहीत. डिजिटल माध्यमांनाही डावलले गेले आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी मधून जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
















