सोलापूर : भारत देशात वाढता आतंकवाद, धार्मिक कट्टरवाद, वामपंथी राष्ट्रद्रोही विचार, विद्यापीठातील राजकीय हस्तक्षेप शहरी नक्षलवाद जातिवाद भ्रष्टाचार शिक्षणाचे बाजारीकरण, धार्मिक कट्टरतावाद अशा राष्ट्रविरोधी विचारांची होळी सोलापूरच्या दत्त चौकात करण्यात आली.
यावेळी ना माओवाद ना मार्क्सवाद सबसे पहिले राष्ट्रवाद, वामपंथी, आतंकवाद की कबर खुदेगी, सावरकर की भूमी पर, नक्षलवादीओ सावधान, जाग उठा है नौजवान, लाल गुलामी तोड के बोलो वंदे मातरम,अशा घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान संघटनेचे महानगरमंत्री आदित्य मुस्के म्हणाले, भारत देशात नकारात्मकता दहन करण्याचा सण हा होळी असतो. ‘एबीव्हीपी’च्या वतीने वामपंथी विचार, नक्षलवाद हे देशासाठी विघातक शक्ती आहे, नक्षलवाद्यांच्या माध्यमातून माओवादी क्रांती करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे, शिक्षणाचे बाजारीकरण होत असून दहावी व बारावीचे पेपर वारंवार कुठे आहेत याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही त्यामुळे अशा या राष्ट्र विरोधी प्रवृत्तींची होळी आज आम्ही केली आहे.
यावेळी सौरभ कुलकर्णी, सागर टक्कळकी, प्रतीक पावडे, ध्रुव अरळीकर, लक्ष्मण माशम यांच्यासह संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

















