सोलापूर : इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याप्रकरणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही योजना जुनीच आहे, त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये असे म्हणून सोलापूरकरांसमोर हात जोडले होते. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दत्तात्रय भरणे यांची बाजू घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचा प्रश्न सध्या सोलापुरात पेटला आहे.
अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता सोलापुरात सर्वपक्षीय नेते एकत्र झाले आहेत, त्यांनी मोहोळमध्ये बैठक घेऊन आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना सद्बुद्धी दे असे साकडे सिद्धेश्वरांच्या चरणी घालण्यात आले.
त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी अतुल खूपसे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना खरेतर बुद्धी नाही त्यांना सद्बुद्धी मिळवण्यासाठी आम्ही आरती केली असल्याचे सांगितले…
















