सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठयाच्या निषेधार्थ माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली मटका फोड आंदोलन करण्यात आले. विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास १ लाख घागरी मोर्चा काढणार असा इशारा चंदनशिवे यांनी यावेळी दिला.
आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्तेयांच्या समवेत पाणी द्या पाणी द्या सोलापूर शहराला पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा असे घोषणा देत मटका फोड आंदोलन करण्यात आले.
सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठामुळे सोलापूर शहरातल्या नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून सातत्याने पाणीपुरवठा झाल्यामुळे त्रास होत आहे सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून समन्वयाचा अभाव असल्यामुळे सोलापूरच्या नागरिकांचे हाल होत आहेत. सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग व सोलापूरचे विद्युत अधिकारी व तसेच पुणे विभागातील विद्युत विभागाचे अधिकारी, मा. जिल्हाधिकारी सोलापूर व पाटबंधारे विभाग यांचा समन्वय करून सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी या कमिटीच्या माध्यमातून करण्यात यावी. तसेच सोलापूर शहराचा समांतर जलवाहिनी उजनी ते सोलापूर हे काम तातडीने हाती घेणे काळाची गरज आहे परंतु सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यां बरोबर समन्वय नसल्यामुळे सातत्याने पाणीपुरवठा विसरळीत होत आहे. सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय गंभीर असून तातडीने या विषया संदर्भात उच्चस्तरीय बैठक लावून हा विषय मार्गी लावावा याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना आनंद चंदनशिवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे सदरच्या सोलापूर शहराचा पाणीपुरवठा न झाल्यास सोलापूर जनतेच्या हितासाठी कायदेशीर आंदोलन करावे लागेल ही नोंद घेणे संदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत आप्पा जाधव सुहास सावंत, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, ह्रुदयनाथ मोकाशी आदी उपस्थित होते.



















