सोलापूर : शहराच्या अनेक भागातून मागील काही महिन्यांपासून कॉलेजला जाणाऱ्या मुली, घरातील विवाहिता बेपत्ता होण्याची प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये वीस वर्षाखालील मुली व विवाहिता सर्वाधिक बेपत्ता झाल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान कर्णिक नगर भागातील सतरा वर्षाची कॉलेज तरुणी वालचंद कॉलेजला शिकत होती. 15 नोव्हेंबर 2022 रोजी कॉलेजला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही. स्वामीनी रवींद्र भग्रे असे त्या मुलीचे नाव असून कुटुंबियांनी तब्बल दहा दिवस तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. शेवटी मुलीची आई मुद्रिका भगरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीला कोणीतरी फूस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.
तसेच मुळगाव रोडवरील राघवेंद्र नगरातील वैष्णवी मंदिर जवळ राहणाऱ्या श्रीदेवी शिवपुत्र बिराजदार वय 28 ही महिला 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता कामाला जाते म्हणून घरातून निघून गेली ती आलीच नाही. दोन दिवस तिची चौकशी केली असता ती मिळून आली नसल्याने नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. वरीलपैकी मुलगी व महिना कुणाला दिसल्यास त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे 0217 2744690 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

















