सोलापूर : अतिशय वादग्रस्त कारकीर्द राहिलेले समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांची अखेर शासनाने उचल बांगडी केली असून त्यांना समाज कल्याण आयुक्तालय शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर सोलापूरचे आणि सध्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण अधिकारी असलेले नागनाथ चौगुले यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजकल्याण सहाय्यक आयुक्त म्हणून आलेले नागनाथ चौगुले हे यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण अधिकारी त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या दोन्ही पदावर त्यांनी काम केले आहे. राजशिष्टाचार न पाळल्याने चौगुले यांची ही यापूर्वी अडचण झाली होती.
दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी कैलास आडे यांच्या कारभाराची चौकशीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन दिली होती. अँटी करप्शन विभागाकडे चौकशीसाठी तक्रार दिली होती. काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली या प्रकरणात ही या अधिकाऱ्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता.


















