सोलापूर : दहावी व बारावीचे निकाल लागल्याने पालकांची उत्पन्न, रहिवासी, जात असे प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र सर्वर डाऊन झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडत आहे याबाबत ठोस नियोजन प्रशासनाकडून केले जात नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी शहर मध्य विधानसभा तर्फे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत असलेल्या सेतू कार्यालय येथे गेल्या एक आठवड्या पासून सर्व्हर (इंटरनेट) प्रॉब्लेमुळे ऑनलाईन कामानिमित्त येणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर आपणं तातडीने लक्ष देऊन या संबंधी उच्चस्तरावर बोलणे व्हावे व या सर्व्हर इंटरनेट प्रॉब्लम दूर करून देण्यात यावे जेणेकरून सेतू कार्यालयात ऑनलाईन कामा निमित्त आलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी मागणी बहुजन समाज पार्टी शहर मध्य विधानसभा तर्फे करण्यात आली.
यावेळी उपस्थित BSP पार्टी शहर मध्य विधानसभा अध्यक्ष इरफान मैंदर्गी, कोशाध्यक्ष मुसेफ फनिबंद, सेक्टर अध्यक्ष फिरोज शेख व अनवर दामाद उपस्थित होते.

















