सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपले सर्वपक्षीय नातेसंबंध जोपासत स्वर्गीय सुनील कामाठी, स्वर्गीय दत्तोपंत कोठे आणि स्वर्गीय विनोद गायकवाड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
माजी नगरसेवक स्व. सुनील कामाठी यांचे निधन झाले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या खड्डा तालीम जवळील त्यांचा निवासस्थानी जाऊन त्यांची पत्नी, मुलगा शिवा, पुतणे आकाश, गणेश, अनिल आणि कामाठी कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तिरुपती परकीपंडला, जितु वाडेकर, महादेव येरणाळ, दीनानाथ शेळके आदि उपस्थित होते.
स्व. विष्णुपंत कोठे यांचे बंधु स्व. दत्तोपंत गणपतराव कोठे यांचे निधन झाले होते. आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुरारजी पेठेतील त्यांचा निवासस्थानी जाऊन कोठे कुटुंबिय जितेश दत्तात्रय कोठे, माजी महापौर महेश कोठे, प्रतिभा कोठे, अभिषेक कोठे, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, कांचन बोमड्याल, कामिनी चिलका, पूजा कोंडी, आरती सादुल, माजी नगरसेवक अविनाश बोमडयाल, प्रथमेश कोठे यांचे सांत्वन केले.
काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक कै. विनोद पुरुषोत्तम गायकवाड यांचे निधन झाले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या निलम नगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची आई पद्मावती, पत्नी संगीता, मुलगा प्रदीप, मुलगी श्रुती, भाऊ कुंदन, विवाहित बहिनी सुवर्णा, कांचन, मनीषा, स्वाती आणि गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी शिवशंकर अंजनाळकर, सतीश संगा, मनोहर माचर्ला, सुजाता आकेन, श्रीनिवास कर्ली, भरत आकेन, सुनील बळी, लालू सानी, शिवानंद बळूरगी, गोविंद श्रीराम, दिनानाथ शेळके आदि उपस्थित होते.


















