काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा चार सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे आणि दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार चार सप्टेंबर रोजी गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोरगरीब, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांना साड्या वाटप व कोविड काळात उत्कृष्ठ काम केलेल्या कोविड योध्दा परिचारिका व डॉक्टर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते व सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव, दक्षिण तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड, काँग्रेसचे नूतन प्रदेश सचिव पंडित सातपुते, नगरसेवक शिवा बाटलीवाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



















