सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडील 10 कनिष्ठ सहायक मधून वरीष्ठ सहाय्यक व 9 कनिष्ठ लेखाधिकारीमधुन सहायक लेखाधिकरी म्हणून पारदर्शकता अवलंबून समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा त्यांच्या कार्यालयात सत्कार केला साहेब तुमची कार्यपद्धती पारदर्शक असून अशाच पध्दतीने सामान्य प्रशासन, आरोग्य,अर्थ व इतर विभागाकडील पदोन्नती नव वर्षाचे भेट द्यावी अशी विनंती केली.
यावेळी विवेक लिंगराज, राजेश देशपांडे,अनिल जगताप,नागेश पाटील, गिरीष जाधव, श्रीशैल्य देशमुख,अरुण क्षीरसागर,लक्ष्मण वंजारी, दत्तात्रय घोडके,रफिक मुल्ला,अमित सलगर, सूर्यकांत तोडकरी,राजीव गाडेकर,वासू घाडगे, ताजमुल मुतावली, संतोष जाधव, संतोष शिंदे, झहीर शेख, योगेश हब्बु,प्रसाद देवळे, पी.सी. कविटकर, आनंद भोसले, आदी उपस्थित होते.

















