सोलापूर : को-जनरेशनच्या चिमणी मुळे चर्चेत असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची अखेर निवडणूक लागली संचालक मंडळाच्या 20 जागांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या दोन सोसायटी मतदार संघातील एक अशा तीन जागा बिनविरोध झाल्या. ऊस उत्पादक मतदारसंघाच्या 15 जागांसाठी 21 तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघाच्या दोन जागांसाठी तीन 17 जागांसाठी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल नव्वद जणांनी माघार घेतली धर्मराज काडादी यांचे पारंपरिक विरोधक सिद्रामप्पा अब्दुल पुरकर यांनी मात्र या निवडणुकीतून माघार घेतली परंतु त्यांचे बंधू संगमेश काडादी यांनी आपल्याच भावासमोर आव्हान उभे केले आहे.
महिलांच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून नव्या संचालक म्हणून श्रीदेवी भीमाशंकर माशाळे, मंगला जयराज काडादी यांचा समावेश आहे.
सोसायटी मतदार संघाच्या 1 जागेसाठी अण्णाराज धर्मराज काडादी हे बिनविरोध झाले.


















