सोलापूर : सांगोला पंढरपूर रोडवर बामणी गावाजवळ दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चारचाकी नॅनो व दुचाकी प्लेटिना यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दूचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अ रविंद नलावडे राहणार शिरभावी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दुचाकी प्लेटिना गाडी क्रमांक mh 45 am 7250 ही गाडी सांगोला कडून पंढरपूरच्या दिशेने जात होती तर चार चाकी नॅनो ही गाडी क्रमांक mh 25 R 4318 पंढरपूरच्या दिशेने येऊन बामणी येथे रोडच्या उजव्या दिशेला वळत असताना सांगोला कडून भरधाव वेगाने येणारी प्लेटिना गाडी चार चाकीच्या डाव्या बाजूस धडकल्याने हा अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये शिरभावी येथील अरवींद नलावडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिकांच्या मदतीने सोलापूर येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले होते. सदर घटनेची माहिती सांगोला पोलिसांना मिळताच सांगोला पोलीस स्टेशन कडील पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यात उपचारा दरम्यान जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

















