सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर वरिष्ठ अधिकारी प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अशा कामचुकार आणि प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्याला शासनाने परत पाठवावे या भूमिकेत वरिष्ठ असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला दीड वर्षानंतर सुनिल खमितकर यांच्या रूपात पूर्णवेळ समाज कल्याण अधिकारी मिळाला. परंतु खमितकर यांचे स्वतःच्या कार्यालयात नियंत्रण नसल्याचे चित्र पाहायला मिळते. कार्यालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदावर काम करणारे सच्चिदानंद बांगर हे तर कामचुकार आहेतच ते कधीही कार्यालयात नसतात असे चित्र असते. बांगर यांना खमीतकर हे शोकास नोटीस काढण्याच्या तयारीत होते.
समाज कल्याण मधील कर्मचारी कार्यालयापेक्षा बाहेर कॅटिन्यूवरच जास्त पाहायला मिळतात. स्वतः खमीतकर हे कार्यालयाची वेळ पाळत नाहीत. वरिष्ठांनी बोलावले तर ते कार्यालयात नसतात, फोन लावला तर कधी स्विच ऑफ असतो तर कधी ते उचलत नाहीत. व्हाट्सअप वर ही ते कॉल घेत नाहीत अशा तक्रारी वरिष्ठांमध्ये होत असलेल्या चर्चेतून ऐकण्यास मिळाल्या. यामुळे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी खमितकर यांच्या कामावर तीव्र असे नाराज असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे.

















