सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक नेहमीच समाजोपयोगी, लोकोपयोगी, कामाबरोबर सभासदांच्या आरोग्याची काळजी सातत्याने घेणारी पतसंस्था असल्याचे नावलौकिक आहे त्याप्रमाणे याहीवर्षी सभासदांचे आरोग्य हित जोपासण्यासाठी आयोजित केलेले शिबिर हे कौतुकास्पद दायित्व असल्याचे प्रतिपादन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1च्या वतीने शांतीसागर मंगल कार्यालयात सभासदांचे सर्वांगीण आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अजयसिंह पवार व उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारी अभियंता पंडित भोसले प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी यशोधरा हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने यशोधरा हॉस्पिटलमधील हृदय रोग तज्ञ डॉ. प्रितेश पवार, हेल्थ इंडियाचे डॉ. स्वरूप वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या वैद्यकीय पथकाने या प्रसंगी सभासदांची आरोग्याची तपासणी केली त्यामध्ये बीपी, शुगर ,ईसीजी, बॉडी मास इंडेक्स या पद्धतीचे सर्व तपासण्या व निदान करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन हरिबा सपताळे यांनी तर योजनेची उद्देश ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ञ संचालक डॉ. एस.पी. माने यांनी तर आभार प्रदर्शन श्रीधन्यकुमार राठोड यांनी मानले. यशोधरा हॉस्पिटल मधील जनसंपर्क अधिकारी मेडशिंगे डॉ. राम व इतर सर्व पथकाचे शाल रोप संतोष धोत्रे यांच्या हस्ते देऊन आभार मानण्यात आले. त्याच पद्धतीने याठिकाणी सभासदांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोरोना प्रतिबंधक लस सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते .
या कार्यक्रमास दयानंद परिचारक, संचालक श्रीशैल देशमुख, दिपक घाडगे, दत्तात्रय घोडके, सुहास चेलेकर, अनिल जगताप, शेखर जाधव, शहाजान तांबोळी, सुंदरराव नागटिळक ,विष्णू पाटील, सुखदेव भिंगे,मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, त्रिमूर्ती राऊत आदी उपस्थित होते. आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे सुभाष काळे ,अशोक पवार, नीतिन येमुल, विनोद कदम , जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले.


















