26 नोव्हेंबर संविधान दिना निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे यांच्या नेतृत्वात खातेनिहाय संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान जागर रॅली काढाण्यात आली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील महासंघाच्या कार्यालयापासून सुरू करून जिल्हा परिषदेसमोरून पासपोर्ट कार्यालय, सिद्धेश्वर मंदीर मार्गे आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ही रॅली विसर्जित झाली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षिरसागर, जिल्हा सरचिटणीस अरविंद जेठीथोर, कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, उपाध्यक्ष अनिल धिंमधीमे, विजय माने, वैजनाथ गायकवाड, सहसचिव विजय लोंढे, महेश इंगळे, संघटन सचिव प्रदीप कांबळे, दत्तात्रय रेळेकर, महसूल शाखेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, सिव्हिल हॉस्पिटल शाखेचे अध्यक्ष सचिन सोनवणे, कोषागार शाखेचे अध्यक्ष कुलदीप सोनवणे, पाटबंधारे शाखेचे शरण आयवळे, संजय कांबळे, नागनाथ धोत्रे, ज्ञानेश्वर हटकर, नरसिंह गायकवाड, चंद्रकांत होळकर, गणेश मस्के, अविनाश गोडसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.