राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर व जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने यावर्षी संत रविदास महाराज यांची जयंती मोठया प्रमाणात आणि विविध सामाजिक उपक्रमानी साजरी करण्यात येणार असून या वर्षीच्या मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्षपदी माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे व कार्याध्यक्षपदी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रल्हाद कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह इथं पार पडलेल्या चर्मकार समाज बांधवाच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावमुळं संत रविदास जयंती मोठ्याप्रमाणात साजरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षी चर्मकार समाजातील सर्व लहान थोर कार्यकर्त्यांसह जयंती उत्सव हा मोठया संख्येने साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
उपाध्यक्षपदी गौराबाई कोरे, पंकज लांबतूरे, अजय कांबळे, सचिन कांबळे, बबलू वनस्कर, सुर्यकांत व्हनकवडे, रवीकांत व्हनकोळे, सतीश इश्वरकट्टी, तुकाराम चाबुकस्वार, राहुल कांबळे, मल्लिकार्जुन साळे, सचिव अविनाश चाबुकस्वार, ईस्माईल हुलसुरे, खजिनदार म्हणून अशोक सुरवसे, मिरवणूक प्रमुख पदी बाळासाहेब आळसुंदे यांची निवड करण्यात आली निवडीनंतर श्रीदेवी फुलारे तसंच प्रल्हाद कांबळे यांचं अभिनंदन करण्यात आलं. सर्वांच्या सहकार्याने हा जयंती उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस अशोक लांबतूरे, सुरेखा लांबतूरे, संजय शिंदे, मधुकर गवळी, अजय राऊत, परशुराम मधुमखाने, शावरच्या वाघमारे, नागनाथ क्षिरसागर, तानाजी जाधव, रविकांत कांबळे, विजयेंद्र शिखरे, राजेंद्र कांबळे, ईश्वर मग्रुमखाने, संजय थोरात, संतोष कासे, सुरेश मोडे, बंधू कबाडे, संतोष कबाडे, बाळासाहेब राऊत, नवनाथ लोहकरे, प्रदिप लांबतूरे, छायाप्पा चव्हाण, कोमल चाबुकस्वार, उषा चाबुकस्वार, अविनाश चाबुकस्वार, अनिल ननवरे, राजू करदम, कृष्णा काळे, विशाल टोणपे, आदिसह चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.



















