सोलापूर : शेतकरी हा अन्नदाता आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे खूप आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः ची उन्नती साधावी असे आवाहन करत खतांची कमतरता पाहता आता सरकारने नॅनो युरिया बाजारात आणला असून भविष्यात नॅनो डीएपी सुद्धा बाजारात आणणार असल्याची माहिती केंद्रीय रासायनिक आणि खते, नवीन अक्षय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज येथे दिली.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त श्री सिध्देश्वर देवस्थान,कृषि विभाग, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 व्याश्री सिध्देश्वर कृषि प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
होम मैदान येथे आयोजित या प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, इंडीचे आमदार यशवंतगौडापाटील, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे, निवृत्त कृषि अधिकारी बरबडे, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याबद्दल समाधान व्यक्त करून केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले, मी स्वत: शेतकरी नाही. पण मला शेतीची खूप आवड आहे. माझ्या मतदारसंघामधील शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांचा लाभ मी स्वत: लक्ष देवून मिळवून दिला आहे. कोणतेही पीक घेताना त्या पिकावरील होणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी आधीच करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी राज्य व केंद्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. केंद्राने व प्रत्येक राज्याने शेतकऱ्यांसाठीखूप चांगल्या योजना राबविल्या आहेत. या योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावले पाहिजे, असे ते म्हणाले.
कृषि प्रदर्शनामध्ये मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केला पाहिजे. शेतकऱ्यांनी रोज किमान अर्धा तास तरी कृषि विषयक टीव्ही वाहिन्यासुध्दा पाहिल्या पाहिजेत. हे कृषि प्रदर्शन खूप चांगले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सिध्दश्वर देवस्थान कमिटीने कृषि प्रदर्शनाचा खूप चांगला व शेतकऱ्यांच्या फायद्याचा उपक्रम राबविला आहे.या कृषि प्रदर्शनामध्ये जे काही मार्गदर्शन मिळेल, त्यावर विचार करून आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय बदल करता येतील, शेती उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल शेतकऱ्यांना मदत होईल. सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या प्रदर्शनाबद्दल उपस्थितांना माहिती देवून प्रदर्शनाचा उद्देश सांगितला.
प्रदर्शनात 200 स्टॉल
प्रदर्शनानिमित्त भव्य शामियाना उभारण्यात आला असून, 200 पेक्षा अधिक दालने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतीपूरक औजारे, प्रगत तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, दुर्मिळदेशी बियाणे, ट्रॅक्टर आदी शेती संबंधित दालनांचा समावेश आहे. 2 जानेवारी पर्यंत हेप्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनाचा शेतकरीव नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpg)
.jpg)
.jpg)

















