सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांची उभे पिके सध्या पाण्यात आहेत, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. अशात शासनाच्या मदतीची सर्वानाच अपेक्षा आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन केली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नागेश बंगाळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम, जिल्हाध्यक्ष संजय रणदिवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, शहराध्यक्षा ऍड सुनयना थोरात, के एम कांबळे, किर्तीपाल शिवशरण यांची उपस्थिती होती.
दरम्यान राजा कदम म्हणाले, जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पाहता सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा भीमशक्ती आंदोलन करेल असा इशारा दिला..



















