वैराग : शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर जिल्हा चिटणीस भाई सुभाष डुरे – पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांच्या मूळगावी इर्ले येथे निधन झाले .
माजी खासदार कै. भाई उद्धवराव पाटील , कै .गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेने , माजी आमदार कै .भाई चंद्रकांत निंबाळकर यांच्या साथीने भाई सुभाष डुरे – पाटील यांनी आजीवन शेतकरी कामगार पक्षाचा लाल बाबटा आपल्या खांद्यावरून खाली येवू दिला नाही .
सुभाष डुरे – पाटील यांनी जि.प.सदस्य, जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून अतिशय उत्तम कार्य केले होते .त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी इर्ले येथे बुधवार दि .८ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .त्यांच्या पश्चात पत्नी , दोन भाऊ , एक बहीण , मुलगा सून , नातवंडे असा परिवार आहे .


















