सोलापूर : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील हे सुद्धा आहेत. दरम्यान शिवसेनेने आपल्या सोळा आमदारांना अपात्र करण्याची नोटीस काढली असून हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. आता या आमदारांबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली असून सध्या केवळ त्यांच्याच नावाची चर्चा संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये होत आहे. दरम्यान शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरवर आपला व्हिडिओ टाकून पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे पहा शहाजी पाटील काय म्हणाले ते….

















