सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष जावेद पटेल यांनी दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात त्यांचे काम सुरू होते.
नुकतेच जावेद पटेल यांना जिल्ह्याच्या सचिव पदावर संधी देण्यात आली आहे. संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी अमोल शिंदे, मनीष काळजे, मनोज शेजवाळ, नाना मस्के, सुधीर गोरे, संजय सरवदे, राजकुमार शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारांशी प्रामाणिक राहून सामाजिक, शैक्षणिक आर्थिक सांस्कृतीक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करून वंचित, अपेक्षितांना उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करण्यासह तसेच अन्याय अत्याचार विरोधात प्रभावीपणे काम करून सर्व समाजातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करून शिवसेना अधिक बळकट व आदर्शमय करण्याची ग्वाही जावेद पटेल यांनी दिली.


















