सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळावी या मागणीसाठी रयत क्रांती पक्षाचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सोलापुरात शेतकऱ्यांचा भव्य असा ऊस मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा पूर्वी आमदार सदाभाऊ खोत हे शासकीय विश्रामगृहावर असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून आम्ही शिवसेनेशी युती केली नसती तर सेनेचे पाच आमदारही निवडून आले नसते यावर सदाभाऊ खोत यांचे प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी शिवसेनेवर आपल्या ग्रामीण स्टाईलने टीका केली. शिवसेना म्हणजे हळद सकट साखरपुडा सकट पळून जाऊन दुसऱ्या सोबत लग्न केलेले नवरी या भाषेत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली पहा ते काय म्हणाले…


















