मोहोळ तालुक्यातील पोखरापूर केंद्र येथे शिक्षण परिषद संपन्न झाली यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी कोरोना महामारीच्या आपत्तीतून बाहेर यावे आणि आपल्या कामाशी निष्ठा ठेवून पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागून जिल्ह्याची गुणवत्ता राज्यामध्ये प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावे. चांगल्या शिक्षकांना शाबासकी व कारवाई बाबतही त्यांनी आपले मत व्यक्त करत गुणवत्ता वाढीवर अधिक भर द्या असे सीईओ दिलीप स्वामी यांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले. या शिक्षण परिषदेला प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड , मोहोळ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी निम्बर्गी, राजशेखर नागणसुरे शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख इटेकर , केंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावीर उन्हाळे तर आभार रुपेश क्षीरसागर यांनी केले.