सोलापूर : सत्ताबदलानंतर महाराष्ट्रात आलेल भाजपा व शिंदे गटाचे सरकार हे रोज एका विकास कामाला स्टे देण्याचा धडाका लावत राज्यात विकास करण्याऐवजी तो भकास कसा करता येईल हे बघत आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यानी केला आहे .
याआधी मेट्रो कारशेड हे कांजुरमार्ग ऐवजी आरे येथेच घेण्याचा निर्णय नव्या सरकारकडून घेण्यात आला आहे यामुळे तेथील जंगलाच नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या तब्बल ५६७.८ कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती . तसेच महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील कामाचा सर्व स्तरावरील निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील जलसंधारणाची ५ हजार कोटी रुपयाची काम रद्द झाली आहेत.
त्याचप्रमाणे राज्यातील आय ए एस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्याहि रोखल्या आहेत एकंदरीत राज्यात या नव्या सरकारला विकास करायचा नसुन तो भखास कसा करता येईल यासाठी काम करत आहेत का? असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यानी केला आहे .



















