सोलापूर : मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणासाठी एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी चलो मुंबईचा नारा दिला होता. सोलापुरात एमआयएमचे राष्ट्रीय नेते बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांनी 11 डिसेंबरला मुंबईमध्ये येणारच असा यलगार सोलापुरात पुकारला. त्यानुसार शनिवार 11 डिसेंबर रोजी हजारोंचा मुस्लिम जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मुंबईमध्ये उपस्थित होता. यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी जोरदार भाषण ठोकले.
सत्तेमधील आमच्या समाजाचा एक मंत्री एका अधिकाऱ्याची जात शोधण्याचा प्रयत्न करतोय,तोच प्रयत्न जर त्यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी केला तर… मात्र त्यांना बोलू दिले जात नाही. 12 डिसेंबर हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस खरे तर त्यांनी आपल्या वाढदिनी ट्विट करून येणाऱ्या अधिवेशनात मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा कायदा संमत करू असे जर केले तर हा पक्ष खरेच सेक्युलर आहे असे मानू अन्यथा आता तिरंगा घेऊन आलोय नंतर पतंग झेंड्या सहित आजाद मैदानावर येऊ असा इशारा शाब्दी यांनी दिला.ऐका काय म्हणाले शाब्दी


















