सोलापूर : काँग्रेसच्या आमदार तथा महाराष्ट्र प्रदेशच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या रणशिंग भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहरात उत्तर मधून फुंकले. या ठिकाणी माजी पालकमंत्री तथा चार वेळा ‘विजय’ झालेले आमदार देशमुख यांना त्यांनी टारगेट केले, स्मार्ट सिटीच्या कामावरून शहराची झालेली अवस्था, शहराला पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा याला केवळ महापालिकेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला होता.
मध्य मधल्या ताई आपल्या बालेकिल्ल्यात येऊन आपल्यावर टीका करत आहेत हे बहुतेक मालकांना सहन झाले नाही, त्यांनी ‘उत्तर’ देणे ठरवले. शहर मध्य भागात त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी ते आता आवर्जून जात आहेत, काँग्रेसवर टीका करत आहेत, त्यांनी नकळत आणि नाव न घेता आमदार प्रणिती शिंदे यांना टारगेट केले. शहरातील लोधी गल्ली तसेच मोची गल्ली मध्ये कार्यक्रमात त्यांनी प्रणिती ताईंच्या कारभारावर काही प्रश्न उपस्थित केले.
यानंतर शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना चांगलेच उत्तर दिले आहे. शहराच्या विकासाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून भारतीय जनता पार्टीला देशात व राज्यात सत्ता मिळाली सोलापूर शहर जिल्ह्यात एक तरी प्रकल्प, उद्योग भाजपने आणला का? विजयकुमार देशमुख यांच्याकडे सहा विभागाची खाती होती ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी शहराचा किती विकास केला? सोलापूर महापालिकेत साडेचार वर्षे झाली भाजपची सत्ता आहे साधं बजेट यांना मांडता आलं नाही.
स्थायी समिती चार वर्ष गठित करता आली नाही, परिवहन व्यवस्थित चालवता आले नाही, स्मार्ट सिटी योजनेत भ्रष्टाचार, मग अशा विजयकुमार देशमुख यांना काँग्रेसवर आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल मनोज यलगुलवार यांनी उपस्थित केला आहे. पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ….


















