सोलापूर : वळसंग गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी दाऊद अमलीचुंगे यांची तर उपाध्यक्ष पदी गजानन भूसणगी यांची निवड झाली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावची ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष उपअध्यक्ष निवड करण्यात आली
यासभेला गावच्या सरपंच महानंदा दुधगी, उपसरपंच स्वामीनाथ कोडले, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, माजी तंटामुक्त अध्यक्ष बुडन कटरे, यासीन कटरे, सत्तार कुरेशी, सादिक कुरेशी, ग्रामसेवक नदाफ, सोहेल कटरे व ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नूतन अध्यक्ष दाऊद अमलीचुंगे उपअध्यक्ष गजानन भूसणगी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


















