सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा एडवोकेट रेखाताई ठाकूर या संघटन,समीक्षा आढावा दौरा सुरू असून मंगळवारी त्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या दरम्यान सकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष नाना मस्के शहराध्यक्ष एडवोकेट बडेखान यांच्यासह शहर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकूर यांनी आगामी महापालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आणि पूर्ण ताकतीने लढवणार कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही असे स्पष्ट सांगितले विशेष करून एम आय एम पक्ष सोबत युती करणार का? असा प्रश्न केला असता त्यांनी स्पष्ट नकार दिला, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे आमचा बेस तयार करायचा आहे असे त्या म्हणाल्या.
दरम्यान ओबीसी आरक्षणावर बोलताना भारतीय जनता पार्टी ढोंगी आहे त्यांच्या खिशामध्ये इम्पेरियल डेटा असतानाही ते रस्त्यावर आंदोलन करतात यावरून त्यांचे ढोंग दिसून येतं, ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रस्थापित नेत्यांवर आमचा विश्वास नाही त्यासाठी आम्हाला संविधानिक लढाई लढावी लागणार आहे असे सांगतानाच वंचित सोडून दिलेल्या नेत्यांबद्दल बोलताना ज्यांच्यात तत्त्व आणि निष्ठा नाही तसेच सोडून गेले आहेत त्यांची आम्हाला गरज नाही. तीन प्रभाग पद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतानाही केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि घराणेशाही चालविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला.

















