सोलापूर : महामार्गासाठी बाधीत झालेल्या पाईपलाईनच्या भरपाई पोटी 1 लाख 43 हजाराचे धनादेश काढून देण्यासाठी 7 हजाराची लाच घेवून लाचलुचपत प्रतिबंधक पथकांच्या कर्मचाऱ्यांना जखमी करुन चार चाकी वाहनातून फरार झालेला तलाठी सुरज नळे यास पोलीसांनी मंगळवेढा – सोलापूर महामार्गावर ताब्यात घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रथिबंधक विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणातील खासगी व्यक्ती पंकज चव्हाण (रा.शेलेवाडी) यास चार दिवसाची पोलीस कोठडी दिली. या प्रकरणात लाचेची रक्कम स्विकारुन तलाठी सुरज नळे हा फरार झाला होता. त्याची चार चाकी गाडी कामती जवळ पोलीसांनी ताब्यात घेतली.
या लाच प्रकरणाने नेहमी चर्चेत असलेले प्रांत कार्यालय आणखीन चर्चेत आले. दरम्यान तलाठी नळे यांच्याकडून या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ? हे तपासात समोर येणार आहे.


















