सोलापूर दि:- १४ एप्रिल शांतीदूत तरुण मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व मानवता विकास मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल रणधिरे व सचिव स्मिता लोंढे यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त परिसरातील होतकरू, गृहकाम करणाऱ्या, गोरगरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिलेल्या बुद्ध मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे डेंटिस्ट डॉ प्रिया कांबळे, भीम प्रतिष्ठानचे बाबा बाबरे, जाई जुई विचार मंचचे अध्यक्ष बंटी चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी, उपाध्यक्ष मसाजी गोतसुर्वे, खजिनदार भिमराव गोतसुर्वे , संचालक महेश रणधिरे, माध्यामिक विभागाचे मुख्याध्यापक महानिंग यलगोंडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका महामाया रणधिरे, साहेरा शेख यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेवून विनम्र अभिवादन करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष महेश रणधिरे, उपाध्यक्ष मयूर शिंदे, सचिव सिद्धार्थ रणधिरे, सहसचिव रोहन साठे, खजिनदार प्रकाश बेलभंडारे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला.
सर्व प्रमुख पाहुण्यांनी मंडळाच्या या स्तुत उपक्रमाबद्दल खूपच कौतुक केले . कष्टकऱ्यांची जाणं राखणारी हया तरुण मंडळातील सर्व पदाधिकऱ्यांनी असेच उपक्रम राबवावे.शांतीदूत तरुण मंडळाने असेच सामाजिक कार्य करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना व मंडळाचे कार्य आणि उद्देश याबद्दल महेश रणधिरे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब चटे व आभार प्रदर्शन सिद्धार्थ रणधिरे यांनी केले.





















