सोलापूर दिनांक – 27 ऑक्टोबर रोजी पुण्यातील समता भूमी म.फुले वाडा येथून लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश अभिवादन व महाराष्ट्रव्यापी जनजागृती यात्रेची सुरुवात होऊन कोल्हापूर,सांगली मार्गे रविवार 31ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता देगाव नाका येथे आगमन झालेला आहे.
यावेळी लढाऊ कार्यकर्ते व नागरिकांकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कॉ.नरसय्या आडम मास्तर, ऍड.एम.एच.शेख, सिद्धप्पा कलशेट्टी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली
प्रा.अब्राहम कुमार,सलीम मुल्ला, श्रीकांत कांबळे,अमित मंचले, अनिल वासम अकील शेख,नरेश दुगाणे,सनी शेट्टी,दत्ता चव्हाण, बाळासाहेब मल्ल्या ळ, शाम आडम, मल्लेशाम कारमपुरी, रवि गेंट्याल,बाबू कोकणे,शहाबुद्दीन शेख,चिदानंद चन्नापागुल,इसाक कुमार, मीरा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.


















