तो गरजूंच्या मदतीला धावून जातो, रात्री बेरात्री वृद्धांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मदत करतो, रुग्णांचे बिल कमी करण्यासाठी सरसावतो, महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो, निराधाराना धान्य वाटप करतो, लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या रुग्ण नातेवाईकांना भोजन पुरवतो, नक्की तो कोण असा प्रश्न पडला असेल प्रत्येकाला. तर तो आहे रुपेशकुमार भोसले.
रुपेश कुमार भोसले हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचा शहराध्यक्ष आहे, सात वर्षांपूर्वी त्याच्या आईच्या किडनीचे ऑपरेशन करण्यात आले होते त्यावेळी त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले पैशाची ऍडजेस्टमेंट करताना त्याला प्रचंड त्रास झाला हे सर्व भोगल्यानंतर त्याच्या लक्षात आले की मला एवढ्या त्रासातून जावे लागले तर इतर गोरगरीब सर्वसामान्य दीनदुबळ्यांना किती त्रास होत असेल तेव्हापासून त्याने ठरवले की गरिबांची सेवा करायची.
श्री मातोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रुपेश कुमार यांनी मागील सात वर्षापासून आपली सेवा सुरू केली आहे. सन 2020 सालच्या मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला, कोरोनाचा देशात संसर्ग सुरू झाला त्याच वेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण पुरवण्याचे मोठे कार्य रुपेशकुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी केले. लॉकडाऊन मध्ये गोरगरीब वंचित आणि निराधार कामगारांना धान्य पुरवण्याचे काम मातोळी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले, कोरोना सारख्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुपेशकुमार भोसले याने आपली जबाबदारी चोखपणे बजावली आहे.
जुना विडी घरकुल भागात पोलीस प्रशासनाने नेमलेल्या विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्याने परिसरात कायम गस्त ठेवली नागरिकांना सतर्क ठेवले, तो रक्तदान शिबिर भरवतो, वृक्षारोपण कार्यक्रम घेतो, कोरोनाची दुसरी लाट आली, अनेकांचा जीव गेला, अशात ही भोसले यांनी कोविड-नॉन कोविड रुग्णांची मदत केली, अनेकांना अंबुलन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली, अनेकांना सिव्हिल तसेच अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.केवळ दाखल केले नाही तर त्यांची वारंवार जाऊन विचारपूस केली काहींना तरी कोविड वार्डात जाऊन रुपेश यांनी भेट घेतली.
शरद रुग्ण हक्क सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जुना विडी घरकुल भागात प्रभाग दहा आणि अकरा मध्ये रात्री नऊ ते पहाटे सहा या वेळेत रुग्णांना मोफत रिक्षा सेवा सुरू केली. जनतेमध्ये आरोग्य साक्षरता येण्यासाठी प्रत्येकाचे ऑक्सिजन लेवल तसेच तापमान तपासणी सेवा त्याने आपल्या भागात सुरू केली , कोरोणा लसीकरण मोहिमेत सहभागी होताना आपल्या भागातील नागरिकांसाठी नोंदणी सुरू केली. सध्या विविध हॉस्पिटलमध्ये जे कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत त्यांच्या नातेवाईकांना भोजन पुरवण्याचे काम रुपेश भोसले करत आहे. आजपर्यंत सुमारे 200 हून अधिक रुग्णांची मदत भोसले यांनी केली आहे. त्याच्या या कार्यात आकाश सोमा, सौरभ बिंगी, प्रकाश देगलमड्डी, ऋषभ गुलापल्ली,अभिषेक सोमा, साई आडम, जयराज रोडगे, विशाल गायकवाड या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.






















