सोलापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला. भाजपचे धनंजय महाडिक निवडून आले. या निवडणुकीत सर्वात पहिलं मतदान हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते.
याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ आमदार सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता राज्यसभेच्या निवडणुकीत पहिलं मतदान करणाऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री भरणेमामा यांचा हातगुणच म्हणावा लागेल त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे तिन्ही खासदार निवडून आले असे म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला चिमटा घेतला. त्याच बरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
















