दक्षिण सोलापूर : राजूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. राजूर सोसायटीसाठी पहिल्यांदाच निवडणुक लागले होती. शेतकरी ग्रामविकास पॅनलने हणमंत बिराजदार, अशोक देवकते, सिध्दाराम ढंगापूरे, राधाकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ग्रामविकास पॅनल तयार करून निवडणुक लढविण्यात आली.
या पॅनलमधून सिध्दाराम पुजारी, मल्लिकार्जून सोनकटले व अर्जुन वाघमारे हे बिनविरोध निवडून आले. तर उर्वरीत दहा जागेसाठी निवडणुक लागली होती. शेतकरी ग्रामविकास पॅनलचे दहा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. विजयी उमेदवार खालीलप्रमाणे:-
■ सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ विजयी उमेदवार खालील प्रमाणे
१. विजयकुमार कलप्पा बिराजदार
२. धर्मराज महादेव बळ्ळारी
३. शिवानंद भिमराव बिराजदार
४. सिध्दाराम अशोक देवकते
५. ज्ञानेश्वर शिवप्पा देवकते
६. अशोक बसप्पा मळेवाडी
७. शंकरेप्पा चनबसप्पा पाटील
८. सिध्दगोंडा बसगोंडा यलगोंडे
■ महिला प्रतिनिधी मतदार संघ
१ पाटील चंद्रकला राधाकृष्ण
२ पाटील मल्लव्वा अभिमान्यू
■ इतर मागास प्रवर्ग
१ सिध्दाराम शंकरेप्पा पुजारी
■ भटक्या जाती प्रवर्ग
१ मल्लिकार्जून म्हाळप्पा सोनकटले
■ अनुसूचित जाती प्रवर्ग
१ अर्जुन लक्ष्मण वाघमारे
हे शेतकरी ग्रामविकास पॅनलचे सर्व तेरा उमेदवार निवडून आले. मतदानानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. निकालानंतर शेतकरी ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार, शेतकरी, मतदारांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष करून नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत सरपंच लक्ष्मण गडदे, उपसरपंच सतीश देवकते, लक्ष्मीकांत बिराजदार, शिवपुञ कोळी , शिवानंद बिराजदार व ग्रामस्थांनी विजयासाठी प्रयत्न केले.

















