सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील बैठक ही आंबेडकरी नेत्यांसाठी प्रतिष्ठेची होती. जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजात दोन गट पडून दोन मध्यवर्ती झाले आहेत. त्यामुळे मंगळवारच्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत काय होणार याकडे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले होते.
या बैठकीला सुरुवातीलाच राजेश उबाळे यांनी आंबेडकर हायस्कूल वर झालेल्या विश्वस्त समितीच्या बैठकीनंतर गुन्हे दाखल काय केले हा मुद्दा उपस्थित केला मात्र या विषयाला पोलीस आयुक्त बैजल यांनी महत्त्व दिले नाही तेव्हा उबाळे बोलण्यास कमी पडत असल्याचे लक्षात घेता राजा सरवदे उठले त्यांनी सविस्तरपणे सांगताना 31 मार्च रोजीच्या बैठकीची कायदेशीर परवानगी पोलीस स्टेशन कडून घेतली होती, महापालिकेच्या उप आयुक्तांकडून परवानगी घेतली असताना चार दिवसानंतर गुन्हे दाखल होण्यामागील कारण काय?
कोणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा आयुक्त बैजल यांनी आता तो विषय चर्चेला नको, सध्याच्या विषयावर सूचना करा असे सांगून बसण्यास सांगितले. आणि राजाभाऊ खुर्ची डबल करू का? असे आयुक्त म्हणताच, नको एकच ठीक आहे यावर मी कम्फर्टेबल असल्याचे सरवदे यांनी सीपी बैजल यांना आपल्या स्टाईलने सांगितले.
https://www.instagram.com/tv/CcQHGlbA6Ck/?igshid=YmMyMTA2M2Y=


















