सोलापूर : मोहोळ तालुक्यातील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका झाली . रविवारी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या सभेत माजी आमदार राजन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले.
ते म्हणाले, आमच्या पोरांना ही लोक बाळं म्हणत आहेत, पण आम्ही पाटलं आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाआधी बाळं असतात आणि याचा स्वाभिमान आम्हाला..ते एवढ्यावर थांबले नाहीत तर भीती आमच्या पोरांना दाखवता का? 17 व्या वर्षी 302 कलम भोगणारी आमची पोरं हायती.. असे वादग्रस्त वक्तव्य राजन पाटलांच्या तोंडून निघाले. शेजारी बसलेले माजी आमदार प्रशांत परिचारक हे ऐकून अवाक् झाले. पहा राजन पाटील याचं हे वक्तव्य…


















