सोलापूर-अतिपावसाने कळमण- कौठाळी रस्ता बंद झाल्याने कौठाळी, शेरेवाडी,भागाईवाडी गावचा संपर्क तुटला…किमान एक महिना तरी हा मार्ग चालु होण्याची शक्यता नसल्याने कौठाळी-शेळगाव हा एकमेव रस्ता नागरीक व वहानधारकांसाठी सत्वपरिक्षा ठरला आहे.
रविवार-सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कौठाळी ( तालुका उत्तर सोलापूर)नजीक असलेल्या ओढ्यावर पाझर तलावाचे पाणी कळमण- कौठाळी रस्त्यावर थांबल्यामुळे हा मार्ग किमान एक महिना बंद राहणार आहे.तर संपर्कासाठी असलेला सोलापूर ,वैराग, बार्शी,तुळजापूर जाण्यासाठी शेळगाव हा एकमेव रस्ता.. मात्र या रस्त्यावरुन नागरीक व वहानधारकांची सत्वपरिक्षा किंवा पुर्वजन्मिचा शापच असं म्हणावे लागेल.
सद्या कौठाळी ते शेळगाव हा उत्तर सोलापूर हद्दीत असलेला 3 किलोमीटर रस्ता अत्यंत खराब असुन काळी माती असल्यामुळे या रस्त्यावरुन मोटार सायकल चालवणे अवघड झाले आहे.त्यामुळे चारचाकी वहाने जात नाहीत. आजारी पेशेंट,शालेय विद्यार्थ्यी,शेतकरी, नागरीक यांची प्रंचड गैरसोय आहे. सदर रस्ता डांबरीकरण मंजुर आहे.मात्र सद्दस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्तावर खडी व मुरुम टाकुन वहातुक योग्य करण्याची मागणी कौठाळी, शेरेवाडी, भागाईवाडी गावातील नागरिकांनी केली आहे.


















