सोलापूर : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे या बुधवारी सकाळी उत्तर सोलापूर पंचायत समिती समोर मंद्रूप गावातील एमआयडीसीला विरोध असलेले शेतकरी आंदोलन करत होते त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला यश आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच शासनाने त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसीची नोंद काढल्याचे उतारे दिले.
यावेळी शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. याचवेळी एका शेतकरी महिलेच्या हातात लहान बाळ होते तेव्हा आव्हाळे यांनी त्या बाळाचे नाव काय? असे विचारले समोरील महिलेने ‘ अन्वी ‘ असे सांगताच अरे माझ्याही मुलीचे नाव ‘अनन्या’च आहे असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यावेळी एका शेतकऱ्याने मुलींचा पायगुण चांगला असतो असे सांगताच आव्हाळे यांनीही मुलींचाच पायगुण चांगला असतो असे सांगून शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत केला. काय होता योगायोग पहा हा व्हिडिओ…..


















