जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी-काही सदस्यांमध्ये समन्वय नसल्याने नाराजीचा सूर उमटला गेला अध्यक्ष बदलाची भाषा काही सत्ताधारी पदाधिकारी आणि सदस्यां मधूनच समोर आली याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदार खासदारांनी एकत्र येऊन या विषयावर तोडगा काढण्याचे ठरवले त्यानुसार सोमवारी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे सात आमदार आणि एक खासदार यांची बैठक झाली या बैठकीत आमदार प्रशांत परिचारक व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारात लक्ष घालायचे असे ठरले तसेच प्रत्येक आमदारांनी जमेल त्या सोमवारी येऊन आपापल्या सदस्यांची कामे करायची असा निर्णय झाला.
हा निर्णय होतोच तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सदस्य रेखा राऊत यांनी या बैठकीची “खिल्ली” उडवली या तर चोराच्या उलट्या बोंबा आहेत ज्यांनी तक्रार केली ज्यांनी सर्वाधिक निधी पळवला त्यांचीच तक्रार होती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना किती निधी मिळतो, समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच कृषी समिती सभापतीना किती निधी मिळतो, जे सदस्य धमकवतात, बोलतात, आरडाओरडा करतात, सर्वांना खाऊ घालतात अशांनाच निधी मिळतो, लघुपाटबंधारे, बांधकाम, ग्रामपंचायत, समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा या ठिकाणी असे होत आहे, झेडपी अध्यक्षांना जाणीवपूर्वक काही ठराविक सदस्य त्रास देतात, त्यांना गोत्यात आणतात अशी परिस्थिती आहे, तसे पाहिले तर जिल्हा परिषद सदस्यांना स्वतंत्र निधी असतो, आमदारांनी काही लक्ष घालण्याची गरज नाही, सर्व सदस्य सक्षम आहेत, जे एक कोटींचा निधी नेतात, तरीही ते समाधानी नाहीत, ज्यांना फक्त 10 ते 15 लाख मिळतात ते समाधानी आहेत, आता काय समान निधी तुम्ही देणार? असा सवाल करत त्या आमदारांनी आपली आमदारकी सोडून झेडपी सदस्य व्हावे अशी खिल्ली रेखा राऊत यांनी उडवली.



















