Monday, June 23, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“या’ गावच्या यात्रेने बदलली परंपरा ; धर्मगुरूने केले संयोजकांचे तोंडभरून कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter





सोलापूर: मे महिना म्हटलं की ग्रामीण भागात यात्रा आणि जत्रांचा सुकाळ असतो. अनेक ठिकाणी धार्मिक यात्रांची वेगवेगळी परंपरा दिसून येते. बदलत्या काळात यात्रांमधील अनेक परंपरांना फाटा देत बदल झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथील श्री चौडेश्वरी यात्रा महोत्सव कमिटीने धार्मिक कार्यक्रमांबरोबर लोकांमध्ये सलोखा राहण्यासाठी वैचारिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. धर्मगुरूंनी ही या बदलाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

मंद्रूप येथील श्री चौडेश्वरी देवीची यात्रा 29 मे ते 2 जून या काळात होत आहे. यात्रेच्या निमित्ताने कमिटीने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच वैचारिक मंथन होण्यासाठी अनेक मान्यवरांची व्याख्याने, किर्तन, भजन, प्रवचनाचे आयोजन केले आहे. मंद्रूपच्या सकळेश्वर मठाचे रेणुकाचार्य शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वमी यांच्याहस्ते या उपक्रमाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. दोघांनीही यात्रा कमिटीने धार्मिक कार्यक्रमाबरोबर समाजात चांगल्या विचारांची मुल्ये  रुजावीत या जाणिवेतून गेल्या पाच वर्षापासून सुरु केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. 

यात्रेच्या निमित्ताने पूजा-अर्चा असे धार्मिक कार्यक्रम तर होतातच. व्याख्यान व प्रवचनाच्या माध्यमातून लोकांमध्ये चांगले विचार रुजले जातात. वैचारिक मंथनाने लोकांमध्ये सामाजिक एकोपा व सुखी संसाराची मुल्ये रुजली जातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकटा पडला आहे. यात्रेच्या निमित्ताने होणारा असा आगळावेगळा उपक्रम इतर गावांनाही आदर्श ठरणारा आहे, असे उद्गार त्यांनी काढले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेल्या प्रकाश कुंभार यांनी पुढाकार घेत समाजात वैचारिक मंथन घडवून आणले आहे. विद्यार्थी घडविण्याबरोबरच त्यांनी समाजाला पुढे नेण्याचे पुण्याचे काम केले आहे, असे कौतुक डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.


गुणवंताचा सन्मान…

या कार्यक्रमात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य  यांच्याहस्ते शोध पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भूमिपुत्र व ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या मेघा घेरडी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच हेमंतकुमार स्वामी, विश्वनाथ स्वामी, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, नागनाथ लोभे, शिवपुत्र जोडमोटे, शिवानंद लोभे, शिवानंद शिंगडगाव, राजकुमार कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी सावित्रीअम्मा, कर्नाटक किर्तन केसरी शरणकुमार स्वामीजी यांचे प्रवचन तर  शोभा महल यांचे कन्नड भजन झाले. मंगळवार दि. 31मे रोजी जादूगार विराट यांचे जादूचे प्रयोग तर अंबादास कनकट्टी यांचा हास्य दरबार हा कार्यक्रम होणार आहे. 1 जून रोजी शालिनीताई इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. 2 जून रोजी अजित्कुमार कोष्टी यांचा हसवणूक हा कार्यक्रम होणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : जिल्हाधिकारी व सिईओ यांच्या संवेदनशिलतेने ग्रामस्थ भारावले…..! पदाचा ऍटीट्युट न बाळगता लाभार्थ्यांच्या सोबत घेतले भोजन

Next Post

सुरेश हसापुरे यांना वाढदिवसाच्या दिवशीच तीन सोसायटी विजयाची भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुरेश हसापुरे यांना वाढदिवसाच्या दिवशीच तीन सोसायटी विजयाची भेट

ताज्या बातम्या

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

23 June 2025
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

23 June 2025
सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

22 June 2025
स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

22 June 2025
रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

21 June 2025
काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025

क्राईम

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

by प्रशांत कटारे
22 June 2025
0

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने...

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1773962
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group