अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी मागील तीन दिवसांपासून सोलापूर शहरातील काँग्रेस भवनासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. शुक्रवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या सायंकाळी सहाच्या सुमारास अक्कलकोट मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भेट देऊन चर्चा केली. शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हापरिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे, सुनील बंडगर यांची उपस्थिती होती.
भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे विरोधक असल्याने आता कल्याणशेट्टी काय बोलणार याची आस शेतकऱ्यांना होती. कल्याणशेट्टी यांनी हे चित्र पाहून तीव्र दुःख व्यक्त केले, दिवाळी हा आनंदाचा उत्साहाचा सण मात्र या दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना असे उपोषण करावे लागते हे निश्चितच दुर्दैवी आहे. या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांच्या सोबत बोललो आहे या प्रकरणात आपण राजकारण बाजूला ठेवू म्हेत्रे साहेब, या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, लवकरच तोडगा काढू असे आश्वासन देत आपली भूमिका मांडली.पहा काय म्हणाले आमदार कल्याणशेट्टी….


















