सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांवरून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एकमेकांच्या अनुपस्थित एकमेकांना नकळत टार्गेट केले. सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी ते निंबाळ या रस्त्याचे काम का थांबवले असा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी सचिन कल्याणशेट्टी सभागृहात नव्हते, काहीवेळाने सिद्धाराम म्हेत्रे आपली पत्रे पालकमंत्र्यांना देऊन बाहेर पडले तेव्हा सिद्धाराम म्हेत्रे यांनी रस्त्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला ही माहिती कल्याणशेट्टी यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला .रस्त्याच्या कामाची क्वालिटी चांगली असेल तर अजिबात अडवणार नाही मात्र काम जर निकृष्ट दर्जाचे असेल तर ते होऊ देणार नाही असे म्हणून नकळत म्हेत्रे यांच्यावर निशाणा साधला.
















