सोलापूर जिल्हा परिषदेतील माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुरू आहे तक्रारदार काका साठे यांच्याकडून मागच्या सुनावणीत एक अर्ज तर मोहिते पाटील गटाकडून दोन अर्ज देण्यात आले होते या तिन्ही अर्जावर 3 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या सुनावनीनंतर निकाल राखून ठेवला होता तो येत्या 10 ऑगस्ट रोजी निकाल देणार होते त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागलं होतं.
मंगळवारी तक्रारदार काका साठे त्यांचे वकील एडवोकेट उमेश मराठे एडवोकेट इंद्रजीत पाटील एडवोकेट बाबासाहेब जाधव यांच्यासह हजर होते तर मोहिते पाटील गटाकडून अरुण तोडकर गणेश पाटील सुनंदा फुले एडवोकेट दत्तात्रय घोडके एडवोकेट नितीन खराडे यांनी हजेरी लावली. सर्वांना निकालाची अपेक्षा होती मात्र तब्बल तासभर चाललेल्या सुनावणी नंतर वकिलांकडून माहिती घेतली असता राष्ट्रवादी काँग्रेस कडून पक्षाची घटना सादर करण्यात आली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही अर्जांचा निकालच तयार केला नव्हता त्यामुळे त्यांनी 17 ऑगस्ट ही तारीख दिली आहे अशी माहिती एडवोकेट मराठे व एडवोकेट घोडके यांनी दिली.
दरम्यान अरुण तोडकर यांनी आमदार संजय शिंदे हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यांचे सदस्यपद रद्द करावे म्हणून अरुण तोडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची सुनावणी अद्याप एकदाही झाली नाही, त्या प्रकरणाची प्राथमिक चौकशीच सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तोडकर यांचे वकील एडवोकेट घोडके यांनी जिल्हाधिकार्यांना समोर आक्षेप घेतला एका केस मध्ये मी विरोधकांचा वकील आहे मात्र दुसऱ्याच केस मध्ये मी तक्रारदाराचा वकील असतानाही ते प्रकरण अजून सुनावणीला येत नाही अशी वागणूक का? हा कुठला न्याय? असे प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.




















