सोलापूर : माळशिरस तालुक्यातील श्रीपुर महाळुंग गटाचे जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थ संकल्पीय आणि शेवटच्या सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी उपस्थितांना पोट धरून हसवले संपूर्ण सभेमध्ये शांत आणि चेहऱ्यावर टेंशन असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हेसुद्धा तोडकर यांच्या बोलण्याने मनसोक्त आणि खळखळून हसले तोडकर हे बोलण्यास उठले असताना सुरुवातीला त्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळेच आपण जिल्हा परिषद सदस्य झालो हा नामोल्लेख घेण्यास ते विसरले नाहीत मात्र अडीच वर्ष विरोधात, दीड वर्ष कोरोनात तर एक वर्ष कोर्टात गेले असे म्हणताच संपूर्ण सभागृहात हशा पिकला… आपले लाडके मित्र आनंद तानवडे मदन दराडे यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करत मैत्री जपली. पाच वर्षात माळशिरस तालुक्याला एक ही पद मिळालं नाही. केवळ मोहिते-पाटील गटाचे सदस्य म्हणूनच आमची ओळख राहिली. दरम्यान अरुण तोडकर यांचे मजेशीर भाषण पहा
















