अकलूज : महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना वीस वर्षांपूर्वीच्या व्यवहारात दोषी धरून त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध जोडण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणेचा भाग असलेल्या प्रवर्तन निदेशालाय (ED)मार्फत अटक केल्याच्या निषेधार्थ व अखंड देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी अकलूजमधील महात्मा गांधी यांच्या स्मरकासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.यावेळी किरण साठे यांनी केंद्र सरकार व राज्यपाल यांच्यावर निशाणा साधून भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मोहिते पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असल्याचा आरोप केला.
सदर आंदोलनाचे निवेदन अकलूज गावचे तलाठी जे एस शिंदे यांनी स्वीकारले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकिर शेख, मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सागर काले,अमोल माने,रहिम शेख,विकि केसकर,,ईन्नुस नदाफ,बलिराम साठे विकी वाघमारे,धवल कांबले,सागर साठे इत्यादी उपस्थित होते.

















