सोलापूर : पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरात मोठी कारवाई केली असून मटका बुकीच्या ठिकाणी रेड टाकत सुमारे पाच ते सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून त्या ठिकाणाहून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हा मटका बुकी विद्यमान नगरसेवक असल्याची माहिती समोर येत असून त्याचा साथीदार व तो फरार झाल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले. मात्र मटका बुकी घेणाऱ्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जुना विडी घरकुल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पोलीस आयुक्तांच्या या विशेष पथकामध्ये API जीवन निरगूडे, पोलिस हवालदार दिलीप भालशंकर, पोलीस नाईक योगेश बरडे, पोलीस नाईक वाजीद पटेल, कॉन्स्टेबल संजय साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नक्का यांचा समावेश आहे.
















